🕒 1 min read
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येतेय. पण अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉकसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने आज शनिवारी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. केंद्राने राज्यांना म्हटलंय की, राज्यांनी कोरोना लॉकडाऊननचे नियम शिथिल करताना काळजी बाळगावी. अनलॉकची प्रक्रिया राबवताना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी, तपासणी-उपचार आणि लसीकरणासारख्या ‘खूपच महत्त्वपूर्ण’ अशा पाच बाबींचा अवलंब कटाक्षाने करावा.
Union Home Secretary Ajay Bhalla writes to chief secretaries of all States to ensure that there is no complacency in adhering to COVID appropriate behaviour and in the test-track-treat-vaccination strategy pic.twitter.com/OXlg2jxdEc
— ANI (@ANI) June 19, 2021
“काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आहे”, असं या पत्रामध्ये गृह सचिवांनी नमूद केलं आहे.
लसीकरणाची गती वाढवा
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सध्य परिस्थितीमध्ये कोरोना लसीकरणाची मोहिम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्वत:ला सांभाळा नाहीतर तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही’
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
