Share

दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षात उत्पादनात २ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकने पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास केला आहे. असे असले तरी या नुकसानीचा थेट परिणाम जीडीपीवर होणार नाही, पण अर्थव्यवस्थेच्या मुल्यवर्धनाला याचा फटका बसेल असं आरबीआयने सांगितलं आहे.

दुसऱ्या लाटेमुळे सर्वच राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे देशांतर्गत मागणी घटली. त्याचा घरगुती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. हे नुकसान सुमारे २ लाख कोटी रुपयांपर्यंत असल्याचा आरबीआयचा अंदाज आहे. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘स्टेट ऑफ इकॉनॉमी’ याबाबत लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेने लहान शहरे आणि ग्रामीण भागालाही विळखा घातला होता.

त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणीवर विपरित परिणाम झाला. तसेच केवळ लसीकरणाद्वारेच विषाणू नष्ट होणार नाही. आपल्याला विषाणूसोबत जगणे शिकावे लागेल. संशोधन आणि लॉजिस्टीक्स या क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी लागेल, असे या लेखात म्हटले आहे.

लेखात म्हटले आहे की, बँकेत पैसे जमा न करण्याचा दर वाढला आहे. याचा अर्थ कोरोना महामारीत लोकांची बचत कमी झाली आहे. लोकांकडे असलेल्या संपत्तीतही १.७ टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनामुळे नागरिकांचा उपचारावरील खर्च वाढला आहे. दुसऱ्या लाटेत लोकांवर गंभीर आर्थिक परिणाम झाले आहेत. पण, येत्या काळात यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. शिवाय लसीकरणाचा सकारात्मक परिणाम पाहिला मिळण्याची शक्यता आहे.

महागाई दर रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त

दरम्यान, देशात महागाईचा भडका उडालेला आहे. किरकोळ महागाई सहा महिन्यांच्या उच्चांकीवर पोहोचली आहे. मे महिन्यात देशातील किरकोळ महागाईदर ६.३ टक्क्यांवर पोचला आहे. एप्रिल महिन्यात महागाईदर ४.२९ टक्के इतका होता. सोमवारी सरकारने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सध्याचा किरकोळ महागाई दर म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या ४ टक्के उद्दिष्टांपेक्षा चांगलाच वर आहे. रिझर्व्ह बॅंक, कमाल महागाईदर ६ टक्के आणि किमान महागाई दर २ टक्के इतका राखू इच्छिते. पाच महिन्यांमध्ये पहिल्यांदाच किरकोळ महागाईदर रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टापेक्षा वर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!