नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ढाका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मोदींनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या काही आठवणी सांगितल्या होत्या.
ते म्हणाले होते, ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशमध्ये आणि भारतातही प्रयत्न सुरू होते. बांगलादेशमधील जनतेची भावना भारतीयांना समजत होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक आहे. मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला होता’ अशी आठवण मोदी यांनी सांगितली.
या विधानावरून विरोधी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराद्वारे पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारला होता की, मोदी यांना कोणत्या जेलमध्ये शिक्षा झाली होती. पीएमओने सांगितले आहे की, ‘आमचे कार्यालय फक्त पंतप्रधान कार्यकाळातील रेकॉर्ड ठेवते. त्यामुळे नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ मध्ये पंतप्रधान बनले त्यानंतरचा रेकॉर्ड कार्यालयाकडे अधिकृतपणे उपलब्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांच्या जेलमधील कालावधीबाबत विचारणारे राजेश चिरिमार हे टीएमसी बिधाननगर महानगरपालिकेचे बोर्ड सदस्य आहेत. त्यांनी २६ मार्च रोजी आरटीआय अर्ज केला होता. चिरिमार यांनी आरटीआयमधून पंतप्रधान कार्यालयाला ३ प्रश्न विचारले होते. कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत नरेंद्र मोदी जेलमध्ये होते? मोदी यांना कोणत्या आरोपाखाली आणि कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं? यावर पीएमओने हा खुलासा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनलॉकमध्ये गर्दी वाढत आहे, काळजी घ्या’, केंद्रीय सचिवांच्या राज्यांना सुचना
- ‘स्वत:ला सांभाळा नाहीतर तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही’
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


