🕒 1 min read
मुंबई : आज सकाळी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद थंड होत नाही. तोवर पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला आहे.
परंतु हा वाद सिंधुदुर्गमध्ये होताच याचे पडसाद आता राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असं सांगतानाच स्वत:ला सांभाळा. तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘परवा झालेल्या हल्ल्यातील हात आणि पाय विसरणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांना सोडणार नाही. शिवथाळी कोण कुणाला देतयं हे पाहूच, असं सांगतानाच प्रसादाची परतफेड कशी करायची एवढं आम्ही शिवसेनेत शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे स्वत:ला सांभाळा नाहीतर विनाकारण तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे तुम्हाला समजणारही नाही, असा घणाघात राणे यांनी यावेळी संजय राऊतांवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खोटी कागदपत्रे दाखवून लाटली जात आहेत शिवभोजन थाळी केंद्र, मर्जीतील व्यक्तींना होतेय केंद्राचे वाटप
- ‘कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना पुन्हा फसवू नका’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘बेपत्ता आमदार प्रताप सरनाईक मातोश्रीवरच’ ; भाजपचा खळबळजनक दावा
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताच शिवसेना-भाजप संघर्षाचा भडका उडणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
