🕒 1 min read
मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. लसीकरणात महाराष्ट्राने आघाडीही घेतली आहे. राज्यात १.५ कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, लस उपलब्ध करुन देण्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कायमच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोप सुरू असतात.
राज्याला देशात सर्वाधिक लसी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्यामुळेच राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकार लस उपलब्ध करुन देण्याबाबत आखडता हात घेत असल्याचे म्हटले आहे. यात आता पुन्हा लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मंबईत तीन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेने जाहीर केले आहे.
पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद
१८ वर्षांवरील नागरिकांचे नियोजित लसीकरण विलंबाने सुरु होण्याची शक्यता
४५ वर्षांवरील नागरिकांना खात्रीपूर्वक मिळणार लस, लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करु नये: नम्र आवाहन
नोंदणी केलेल्यांनाच यापुढे मिळणार लस pic.twitter.com/nxFS5iBwQA
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 29, 2021
या संदर्भात मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. यामध्ये मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे नियोजित लसीकरण विलंबाने सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ४५ वर्षावरील नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात लसीकरण केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहनही मुंबई महानगर पालिकेने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका, डॉक्टरांच्या संपर्कात राहून रुग्ण घरीच बरे होतात’
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- पश्चिम बंगाल : एक्झिट पोलमध्ये भाजपची मुसंडी तर ममतादीदींच्या जागा घटल्या, मात्र सत्ता…
- पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीसांसह दरेकरांवर गुन्हा दाखल करा; एसआयटी नेमा : भाई जगताप
- ‘उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर सणसणीत ताशेरे मारलेत, आता तरी उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
