नवी दिल्ली- भारताची सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढाई सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणेवरील ताण अधिक वाढला असून, औषधांसह आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, त्यांच्याशी कोरनाविरोधातील या लढाईसाठी भारतीय सैन्य दलाकडून घेतल्या जात असलेल्या विविध उपक्रांमाबाबत माहिती दिली व चर्चा केली.
लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिथे विशेष कौशल्ये आवश्यक आहेत तिथे लष्कर मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे अशी माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली.
लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करीत असल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली. जिथे शक्य आहे तिथे लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. नागरिक उपचारासाठी त्याच्या नजीकच्या लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- Big Breaking : पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान बॉम्बस्फोट
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

