Share

‘उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर सणसणीत ताशेरे मारलेत, आता तरी उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का ?’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. शिवाय आरोग्य यंत्रणांवरील ताण जैसे थे आहे. सध्या केंद्राने मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्यातील तुटवडा काहीसा कमी झाला असला तरी रुग्णालयांमध्ये अद्यापही बेड मिळत नाहीये. काही रुग्ण हे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने तर काही रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

लोक अजूनही बाहेर फिरत आहेत, आरोग्य यंत्रणांवर ताण वाढतोय, लसींचा पुरेसा साठी उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावेच लागतील अन्यथा हे कुठेच थांबणार नाही. याची कल्पना राज्य सरकारला द्या, अशा कडक शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला सूचना केल्या आहेत.

यावरून भाजपने राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका केली असून आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का ? असा खोचक सवाल केला आहे. ‘राज्य सरकारवर सणसणीत ताशेरे मारलेत. पण कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावाने कांगावा करणार, अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ देणार राज्य सरकार या ताशेऱ्यातून काही धडा घेणार का? उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का?’ असं टीकास्त्र महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!