Share

पश्चिम बंगाल : एक्झिट पोलमध्ये भाजपची मुसंडी तर ममतादीदींच्या जागा घटल्या, मात्र सत्ता…

Published On: 

कोलकाता : एकाबाजूला देश कोरोनाशीलढत असताना देशात ५ राज्यांच्या निवडणूक घोषित करण्यात आल्या. कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आल्यामुळे या निवडणूका जाहीर करण्यात आल्या मात्र ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ या राज्यांमध्ये आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सबंध देशाचं लक्ष आता या निवडणुकांच्या निकालांकडे लागलं असून सर्वाधिक चर्चेची ठरली ती पश्चिम बंगालची निवडणूक. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला कडवी लढत दिली असून भाजपने देखील यंदा जोरदार टक्कर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या निवडणुकांमध्ये जोर लावला होता.

तर, भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह भाजप विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठींबा जाहीर केला. आज बंगालच्या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच एक्झिट पोल्स पाहता बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून पक्षाला आतापर्यंतच मोठं यश मिळेल असं या आकडेवारीतून दिसत असलं तरी सत्ता मात्र भाजपला स्थापन करता येणार नाही.

ममतादीदींनी कडवी लढत दिली असली तरी भाजपच्या आव्हानामुळे त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी त्याच पुन्हा पश्चिम बंगालमध्ये यशस्वीपणे सरकार स्थापन करतील असा अंदाज एक्झिट पोल्स मधून समोर येणाऱ्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तर, काँग्रेसची जोरदार घसरगुंडी झाली आहे. दरम्यान, निवडणूक झालेल्या राज्यांचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Tv9-पोलस्ट्राट एक्झिट पोल –

तृणमूल (TMC) – 142 ते 152
भाजप (BJP) – 125 to 135
डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – 16 to 26
अन्य (OTH) –
एकूण – 292

ABP- C वोटर एक्झिट पोल

तृणमूल TMC+ : 152-164
भाजप + : 109-121
काँग्रेस + : 14-25

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!