नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित होत आहेत. औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकच काय तर स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे.
देशात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवनवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 379,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3645 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,69,507 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 360,960 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती
अशात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ‘घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका. बहुतांश रुग्ण हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरीच बरे होऊ शकतात. मी हे केवळ आरोग्यमंत्री म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून ही सांगत आहे,’ असं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन बियाणे इतरांना द्यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- तिसऱ्या टप्यासाठी मानवत शहरामध्ये ७ लसीकरण केंद्रे सुरु करण्याची मागणी
- राज्य सरकारचीच चौकशी करा; परमबीर सिंह यांची न्यायालयात याचिका
- ‘राज्याचे आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का ?’ पडळकरांची टोपेंवर जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

