Share

औरंगाबादेत 7 आरोग्य केंद्रांत लसीकरण, 2 केंद्रांत पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Published On: 

औरंगाबाद : संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहरातही महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

यामध्ये बन्सीलालनगर आणि सादातनगर या दोन केंद्रांवरील लसीकरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

शहरात पहिल्या टप्प्यात 24 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. बन्सीलालनगर, सादातनगर, सिल्कमिल कॉलनी, एन-8 आरोग्य केंद्र, एन-11 आरोग्य केंद्र, भीमनगर आणि नेहरू नगर या सात केंद्रांवर लसीकरण होईल. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 700 जणांना लस दिली जाणार आहे. तर यामध्ये मनपाच्या आरोग्य विभागाला 122 केंद्रांवर लसीकरण करता येईल, अशी तयारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!