Share

‘अशोक चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही, ते मराठाच नाहीत’

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात २५ जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. याआधी पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण पेटताना दिसत आहे. अशातच मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने २५ तारखेच्या सुनावणीमध्ये मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी काही मराठा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.

आज मुंबईच्या आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. यावेळी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विखारी टीका करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

‘मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवले पाहिजे. मी पदावर असतानाही माझी भूमिका तीच होती आणि पदावर नसतानाही माझी भूमिका तीच आहे, असं सांगतानाच चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही. ते मराठाच नाहीत,’ असा घणाघात नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!