मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यासह इतर नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिला आहे. ‘लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी’ अशी मागणी करत त्यांनी महाविकास आघाडीला राज्यातील सुरक्षेवरून टोमणा देखील मारला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे एका पत्रकातून सविस्तर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
‘महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही.
आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानांना वगळण्यात आलं आहे. त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे. पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट राहावी. पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा आहे’. असं ते म्हणाले आहेत.
लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हिच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी. pic.twitter.com/1JWV7jWeF2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 10, 2021
महत्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात; वाय दर्जा ऐवजी मिळणार ‘ही’ सुरक्षा
- हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही… वर्णद्वेषावरून कोहलीनं ऑस्ट्रेलियाला खडसावलं
- भंडारा : राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अल्प असून त्यात वाढ करावी – रामदास आठवले
- हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…
- ‘खरं तर सत्तारांचे मी केसच उगवू देणार नव्हतो, मात्र आता त्यांना टोपी काढू देणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

