मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात २५ जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. याआधी पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण पेटताना दिसत आहे. अशातच मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. आज मुंबईच्या आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका करण्यात आली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे. ‘मराठा आरक्षणावर अजित पवार का बोलत नाहीत. त्यांचे रक्त का सळसळत नाही?’ असा सवाल पाटील यांनी केला आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हे देखील या सभेला उपस्थित राहणार होते. मात्र, ते हजर न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुरक्षा हटवल्याबद्दल आभार ! राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी’
- हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही… वर्णद्वेषावरून कोहलीनं ऑस्ट्रेलियाला खडसावलं
- भंडारा : राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अल्प असून त्यात वाढ करावी – रामदास आठवले
- हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…
- ‘खरं तर सत्तारांचे मी केसच उगवू देणार नव्हतो, मात्र आता त्यांना टोपी काढू देणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

