Share

हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही… वर्णद्वेषावरून कोहलीनं ऑस्ट्रेलियाला खडसावलं

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांना काल शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण आज सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली.

यावेळी कप्तान अजिंक्य रहाणे शांत बसला नाही. सिराजने तक्रार करताच कर्णधार रहाणेने याबाबतची पंचांकडे तक्रर केलीच सोबतच सामनादेखील थांबवला. कर्णधार रहाणेने घेतलेल्या भूमिकेनंतर पंच आणि पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी पोलिसांच्या मदतीने सिराजवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली.

यासर्वावर आक्रमक शैलीने मैदान गाजवणाऱ्या विराट कोहलीने देखील या घटनेचा निषेध केला आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे. ‘वर्णद्वेषी टिप्पणी अजिबात मान्य नाही. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना अशा अनेक अनुभवानंतर मी असे म्हणू शकतो की ते सहनशीलतेच्या बाहेर आहे. मैदानावर हे पाहणे फार वाईट आहे. या घटनेचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून पुढे अशा घटना होणार नाहीत.’ असं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला खडसावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!