Share

…तर ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात २५ जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. याआधी पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण पेटताना दिसत आहे. अशातच मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने २५ तारखेच्या सुनावणीमध्ये मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी काही मराठा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.

आज मुंबईच्या आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. यावेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. ‘SEBC आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न करावे. जर २५ तारखेच्या सुनावणीमध्ये मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागला नाही तर राज्य सरकारने सद्याच्या ५० टक्क्यामधील आरक्षणातूनच मराठा समजला आरक्षण द्यावे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार ५० टक्क्याच्या आत OBC समूहात समाविष्ट करून आरक्षण द्यावं.’ अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या आजच्या सभेतून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!