Share

लसीकरणामुळेच कोरोना आटोक्यात येईल; पण सरकारला चिंताच नाही : राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

देशात कोरोनाचे संकट वाढले असून आतापर्यंत तीन लाखहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने व्हावे अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे, पण सरकारला याबाबत चिंताच नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचे संकट आटोक्यात येईल असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. परंतु लसीकरणाबात सरकारला चिंता नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी एक इन्फोग्राफिक शेअर केला आहे. त्यात जानेवारीपासून कशा प्रकारे लसीकरणाचे प्रमाण कमी झाले हे सांगण्यात आले. आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचे दिवसाला सरासरी 25 ते 26 लाख डोस निर्माण होत आहे, एप्रिल महिन्यात ८ कोटी 98 लाख कोरोना प्रतिबंधक लस देण्या आल्या होत्या. तर मे महिन्यात 3 कोटी 69 लाख लस देण्यात आल्याचे या इन्फोग्राफिकमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!