Share

आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आक्षेप घेतल्यानंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवरील आपले वक्तव्य मागे घेतले आहे. रामदेवबाबांनी एलोपॅथीला ‘मूर्खतापूर्ण विज्ञान’ असे म्हटले होते. यावर आक्षेप घेत हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहिले.

हर्षवर्धन यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘तुमच्या वक्तव्यामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला आहे. देशाच्या भावना दुखावल्या आहेत. तुमच्या वक्तव्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी होऊ शकते. कोरोनाच्या विरोधातील आपली लढाई कमकुवत करू शकते. एलोपॅथिक औषधांनी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले आहेत. एलोपॅथिक औषधांच्या सेवनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घ्यावे.’

हर्षवर्धन यांच्या आक्षेपानंतर रात्री रामदेवबाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले. ते म्हणाले, ‘मी वैद्यकीयशास्त्राच्या प्रत्येक रूपाचा सन्मान करतो. एलोपॅथीने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.’  तथापि, त्याआधी रामदेवबाबांच्या पतंजली योगपीठाने आयएमएच्या टिप्पण्या चुकीच्या असल्याचे म्हटले होते.

आयएमएने सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा हवाला देत शनिवारी रामदेव बाबांवर आरोप केले होते. आयएमएने म्हटले होते की,‘एलोपॅथी मूर्खतापूर्ण विज्ञान आहे, भारताच्या औषधी महानियंत्रकांकडून मंजुरी मिळालेली रेमडेसिविर, फेव्हिफ्लू आणि इतर औषधे कोरोनावरील उपचारांत अपयशी ठरली आहेत, एलोपॅथिक औषधांच्या सेवनाने लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असा रामदेवबाबा यांचा दावा आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!