🕒 1 min read
धुळे : मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यामुळे एमएस्सीसाठी प्रवेश मिळाला नाही. तसेच दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे.
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील भावेश दिलीप चव्हाण (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील महाविद्यालयातून भावेश हा बी.एस्सी. उत्तीर्ण झाला होता. केमिस्ट्री या विषयातून त्याने पदवी केली होते. मराठा आरक्षण रद्द झाल्याने भावेशला प्रवेश मिळू शकला नाही. अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणारा खर्च त्याला परवडणारा नव्हता. कुटुंबाची परिस्थितीही जेमतेम होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो विवंचनेत होता. याच नैराश्यातून त्याने टाेकाचे पाऊल उचलत रविवारी दोंदवाडे शिवारातील एका शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याला हिरे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
चव्हाण कुटुंबीयांची कुळथे शिवारात शेती आहे. वर्ष १९८३ मध्ये शेतीचा काही भाग हा पाझर तलाव प्रकल्पात गेला. त्याच्या मोबदल्यात त्यावेळी सुमारे २० हजार रुपये मिळाले होते. इतर कुठलाही शासकीय लाभ मिळाला नव्हता. चव्हाण दांपत्याचा भावेश एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. यापैकी दोन बहिणी विवाहित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान


