जालना: १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज किमान २५ हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात यावे. रविवारीसुद्धा लसीकरण होईल, याची दक्षता घेत लसीकरणामध्ये जालना जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहावा,याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या तर वाढत्या रुग्णसंख्येला बघून संस्थात्मक अलगीकरण करण्याकडे भर देण्याचे त्यांनी निर्देश दिले.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची प्रकृती खालावून रुग्णांना मृत्यूच्या दाढेत जावे लागते, ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात येऊन कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री टोपे यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचा व कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
महत्वाच्या बातम्या
- जालना; सकाळी उघडलेली बाजारपेठ पोलीस येताच बंद!
- ‘या’ कारणामुळे झाला कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

