Share

पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण

Published On: 

चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.

मुंबई इंडियन्सचा केकेआरविरुद्धचा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. केकेआरपुढे मुंबईने विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्या ठेवले होते. या आव्हााचा पाठलाग करताना केकेआरने चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. आणि मुंबईने आयपीएलच्या या हंगामातील पहिला विजय साजरा केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर कोलकाता संघ हा पाचव्या स्थानी घसरला आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स विराजमान आहे.

दुसऱ्या डावात दमदार सलामी भागीदारीनंतर कोलकाताचा डाव पु्र्णपणे गडगडला. सलामीवीर शुभमन गील आणि नितीश राणा सोडता केकेआरच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. मुंबई इंडियन्सकडुन राहुल चाहरने सर्वाधिक ४ गडी बाद केले, तर ट्रेंट बोल्टने २ आणि कृणाल पंड्याने १ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!