Share

‘या’ कारणामुळे झाला कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव

Published On: 

चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.

सामन्यातील पहिल्या डावात कोलकाताच्या गोलंदाजानी चांगली कामगीरी करत मुंबईच्या संघाला केवळ १५३ धावांवर रोखले. विशेष म्हणजे कोलकाताच्या गोलंदाजानी आयपीएलमधील बलाढ्य फलंदाजी अशी ख्याती असलेल्या मुंबई इंडियन्सचा संपुर्ण संघ बाद केला. दुसऱ्या डावातही कोलकाताने अतिशय जोरदार सुरुवात केली. मागील सामन्यातील सामनावीर नितीश राणाने या सामन्यातही आपल्या बॅटचा तडाखा मुंबईच्या गोलंदाजाना दाखवत अर्धशतक झळकावले. ज्यावेळी केकेआरचा पहिला गडी बाद झाला त्यावेळी धावसंख्या होती ७२, याचा अर्थ कोलकाताने जवळपास अर्धे लक्ष्य केवळ एका गडीच्या मोबदल्यात पार केले होते आणि तेही केवळ ९व्या षटकात.

या परिस्थीतीत केकेआरचा विजय निश्चीत मानला जात होता. मात्र नितीश राणा बाद झाल्यानंतर कोलकाताच्या इतर फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ख्याती असलेला आंद्रे रसलने १५ चेंडुत केवळ ९ धावा केल्या. तसेच राहुल त्रिपाठी, मॉर्गन, शाकिब अल हसन हे बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. त्यामुळे कोलकाताने हाती आलेला सामना गमावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!