चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडिसन्सच्या सुर्यकुमार आणि रोहित वगळता इतर फलंदाजाच्या अपयशामुळे मुंबईच्या संघाला केवळ १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे या सामन्यात मुंबईचे सर्व गडी बाद झाले होते. त्यात दुसऱ्या डावात केकेआरच्या सलामीवीरानी ७२ धावांची सलामी देत मुंबईचा पराभव निश्चीत केला होता. मात्र मुंबईच्या गोलंदाजानी आखेरच्या ४ षटकात अशी काही गोलंदाजी केली की कोलकात्याचा विजयाचा घास हिरावून घेतला.
सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबईच्या गोलंदाजानी आखेरच्या चार षटकात केवळ १९ धावा दिल्या. तर दोन गडीही बाद केले. आखेरच्या चार षटकात कोलकाताला २४ चेंडुत ३० धावांची अवश्यकता होती. १७वे आणि १९वे षटक हे जसप्रीत बुमराहने टाकले. या दोन्ही षटकात बुमराहने केवळ १२ धावा दिल्या. महत्वाचे म्हणजे समोर फलंदाजी आंद्रे रसल आणि दिनेश कार्तिक हे करत होते. तर १८वे षटक हे कृणाल पाड्यांने टाकले, या षटकात कृणालने केवळ ३ धावा दिल्या. त्यामुळे आखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी १५ धावांची गरज होती. आखेरच्या षटकात ट्रेंट बोल्टने आंद्रे रसल आणि पॅट कमिन्स या दोघांना बाद करत केवळ ४ धावा दिल्या आणि मुंबईचा विजय साकार केला.
महत्वाच्या बातम्या
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
- ‘असंघटीत क्षेत्रातील मजूर ते गावगाड्यातील बाराबलुतेदारांचा साधा विचारही या सरकारनं केलेला नाहीये’
- आर्थिक मदत महाराष्ट्राच्या एकूण जीडीपीच्या एक टक्के देखील होत नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी ‘चेक द ब्रेन’ हे जास्त योग्य आहे; नितेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

