Share

जालना; सकाळी उघडलेली बाजारपेठ पोलीस येताच बंद!

Published On: 

जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध लावले आहेत, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु, यानंतरही काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली. या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांसह इतर वर्गाला त्रास होत असल्याने याचा विरोध होत आहे.

दरम्यान, गुढीपाडवा सण असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही इतर व्यावसायिकांनी दुकाने उघडली. बाजारातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पोलिसांनी मंगळवारी दुपारीही दुकाने बंद केली. यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलिस व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडल्यास बुधवारपासून व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पोलिस बाजारपेठेत उतरल्यानंतर दुपारनंतर बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पोलिसांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांचे शटर लावल्यामुळे दुपारनंतर बाजारपेठ बंद झाली होती. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवार हे दोन दिवस बाजारपेठ शंभर टक्के बंद होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!