Share

मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव

Published On: 

चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारीत २० षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या. मुंबई कडुन मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने धडाकेबाज अर्धशतक झळकावत ३६ चेंडुत ५६ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. तर सलामीवीर रोहित शर्माने ४३ धावांची खेळी केली. कोलकाता कडुन अष्टपैलू आंद्रे रसलने ५ गडी बाद करत महत्वाची भूमिका पार पडली.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात दमदार झाली त्यांचा पहिला गडी ७२ धावांवर परतला तेव्हा ते भक्कम स्थितीत होते. यावेळी सलामीवीर नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक झळकावत विजय जवळपास निश्चीत केला होता. मात्र कोलकाताच्या सलामीवीर सोडले तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ख्याती असणारा आंद्रे रसलने १५ चेंडुत अवघ्या ९ धावा केल्या. आखेरच्या चार षटकात केवळ १९ धावा देत मुंबईने केकेआरच्या संघाला १४२ धावांवर रोखले. राहुल चाहरने मुंबईकडून सर्वाधिक ४ गडी बाद केले, तर ट्रेंट बोल्टने २ आणि कृणाल पंड्याने १ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!