Share

चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर

Published On: 

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते हे खुप जवळचे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रीनी क्रिकेटपटुंशी लग्न करुन संसार थाटला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. याव्यतीरीक्त काही क्रिकेट खेळाडूनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर चित्रपट बनवले गेले. अशीच एक घटणा बीसीसीआयचा आध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बाबतीत घडली होती.

द बेंगाल टायगर म्हणून क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीला एकदा बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचा फोन आला होता. घोष यांनी गांगुलीला चित्रपटात काम करण्याचा आग्रह केला. घोष गांगुलीला म्हणाले,’मी एक चित्रपट बनवत आहे, आणि त्या चित्रपटात मला तुम्ही नायक म्हणून हवे आहात’ असे म्हणाले. यावर गांगुलीने नम्रपणे नकार दिला आणि म्हणाले,’तुम्ही एक काम करा. माझ्यासाठी स्वयंपाक करा, कारण मी आता तुमच्या घरी जेवण करायला येणार आहे’ असे उत्तर दिले. घोष यांच्याशी खुप चांगले संबध असल्याची कबुली यावेळी गांगुलीने दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

घोष यांचा २०१३ मध्ये मृत्यु झाला त्यावेळी गांगुली इंग्लंडमध्ये होते. बंगाली सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम निर्मात्यांमध्ये ऋतुपर्णो घोष यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान सौरव गांगुली हे ‘दादागीरी अनलिमिटेड’ या नावाचा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. हा कार्यक्रम झी बंगाल या चॅनेलवर प्रदर्शित होत असतो. या कार्यक्रमात अनेक मान्यवर हजेरी लावत आसतात. या कार्यक्रमाला बंगालमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!