मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी सामन्यांसाठी रवींद्र जडेजाचे पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.
टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या ब्रेकमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जय्यत तयारी करताना दिसत आहेल.
संपूर्ण क्रिकेट विश्वात उत्सुकता लागली आहे ती पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लढतीची. या लढतीबद्दल अनेक जण मत व्यक्त करताना दिसत आहेत. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉटी पानेसर याच्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑलराउंडर रविंद्र जडेजा हा भारतासाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद फायनल मॅचसाठी कशा प्रकारची खेळपट्टी तयार करते यावर बरच काही ठरणार आहे. या निर्णायक लढतीत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. माझ्या मते रविंद्र जडेजा एक्स फॅक्टर असेल. आयपीएलमध्ये तो शानदार फॉर्ममध्ये होता.
महत्त्वाच्या बातम्या
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
- पदोन्नती आरक्षण : सरकारमधील वाद टोकाला, कॉंग्रेस मंत्र्याने दिला थेट ‘हा’ इशारा
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

