नवी दिल्ली- कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात थैमान घातले आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या अडचणीच्या प्रसंगात त्यांना मदत करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यातच आता टाटा स्टीलने संकटात सापडलेल्या या कुटुंबीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीसाठी काम करताना आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टील व्यवस्थापनानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. टाटा स्टील व्यवस्थापनाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.
परिपत्रकात टाटा स्टील व्यवस्थापनानं म्हटलं आहे की, ‘कोरोना महामारीच्या कठिण काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे आपण सर्वजण मिळून उत्तम भविष्य निर्माण करु शकू. टाटा स्टील सामाजिक सुरक्षेतंर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेणार आहे.
‘कंपनीचे कर्मचारी आणि भागधारक यांच्या हितासाठी कंपनी व्यवस्थापन नेहमीच कार्यरत आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात देखील टाटा स्टील सर्व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वी देखील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावलं उचलली आहेत.’ असे कंपनीने या विषयावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवन नव्हे तर वर्षा बंगल्याला भुताटकीने पछाडले’, ‘हनुमान चालिसा पाठ’ करुन घेण्याचा भाजपचा सल्ला
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

