मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून तसेच बंडखोर आमदारांनी जल्लोष साजरा केल्याचे म्हटले जात होते. मात्र यावरच शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केल्याचे वातावरण निर्माण केले गेले, मात्र असे काहीही नसून शिंदे गटातील कोणत्याही आमदाराने जल्लोष केला आहे. शिवसनेने महाविकास आघाडी सोबत युती केल्याच्या विरोधात हे पाऊल घेतले गेले. त्यामुळे कुठलेही सेलिब्रेशन आम्ही केले नाहीये.”, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढताना आम्हाला आमच्या नेत्याशी अप्रत्यक्ष लढावे लागले, याचे दुःख प्रत्येक नेत्याला आमदाराला आहे. त्यांचा आमच्या मनातील आदर अजूनही कायम आहे आणि राहणार. परंतु आम्ही सांगितलेली भूमिका शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. नाहीतर हा प्रश्न कधीच मिटला असता. तसेच आज एकनाथ शिंदे मुंबईला येण्यासाठी निघाले असून लवकरच ते भाजपश चर्चा करतील असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया! म्हणाले, “आम्हाला आनंद…”
- Kangana Ranaut On Uddhav Thackeray : “पाप वाढलं की सर्वनाश होतो” ; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला
- गडबड होणार..! यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधून भारताचा ‘हा’ गोलंदाज बाहेर?
- KL राहुलने सर्जरी झाल्यानंतर शेअर केली ‘ही’ खास पोस्ट; पाहा PHOTO!
- Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे सुचक ट्वीट! म्हणाले, “एखादा माणूस…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

