🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरु झाली असून यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री,आमदार, खासदार या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी दाखल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघायला मिळाला. पत्रकार परिषद सुरु होताच संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर, आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,‘केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी मला सांगितले की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळत आहे. त्याचवेळी संजय राऊत हे शिवसेनेत एकटे पडतायत का असाही सवाल विचारला जात होता. त्यावर आज संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Sena Press Conference : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार?
- महाराष्ट्र ***ची औलाद नाही, कितीही वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही – संजय राऊत
- “…तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ‘त्या’ दलालाला शिवसेना जोड्याने मारेल”, संजय राऊतांचा इशारा
- “किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल, धमक्या देतो”; संजय राऊत आक्रमक!
- ७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून सुसाट स्टंट ; तरुणाईला लाजवेल असा उत्साह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
