Share

“…तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ‘त्या’ दलालाला शिवसेना जोड्याने मारेल”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद सुरु आहे. प्रचंड गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह आणि मोठ्या घोषणांसह या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली. शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित आहेत. सर्वांनाच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)काय बोलणार यांची उत्सुकता होती. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

भाजपचा दलाल किरीट सोमय्या म्हणतो की, उद्धव ठाकरे यांनी कोरलई गावात १९ बंगले बांधले. असे असले तर आपण सर्व पत्रकार तिथे पिकनिकला जाउत. आणि बघुत खरच तिथे बंगले आहेत का? आणि जर तिथे बंगले असतील तर मी राजकारण सोडेल, अन्यथा शिवसेना किरीट सोमय्या यांना जोड्याने मारेल. असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षांपूर्वी मराठी भाषेविरुद्ध कोर्टात गेला, हा असतो भडवा, दलाल. अगोदर याचे थोबाड बंद करा, नाहीतर आम्ही बंद करूत. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून  महाराष्ट्र गांडूच्या औलाद नाही. हेच सांगायचे म्हटले. शिवसेना, ठाकरे परिवार ,महाविकास आघाडी मधील नेते सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणेनी हल्ले केले. असेच संकट पश्चिम बंगालवरही आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर. एकत्र तुम्ही सरेंडर व्हा, नाहीतर सरकार आम्ही घालवू. अशा धमक्या सतत दिल्या जात आहेत. १७० बहुमत असताना भाजप लोक दोन दिवसांनी एक तारीख देतात. हे तुम्ही कोणाच्या भरवश्यावर तारीख देता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!