Share

“किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल, धमक्या देतो”; संजय राऊत आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज (मंगळवार) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार व पादाधीकारी उपस्थित आहेत.गेले काही दिवस भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान या सर्व आरोपांना संजय राऊत आज उत्तर देत आहेत.

संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांचे फोन येऊन गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे फोन आले होते. महाराष्ट्र—- औलाद नाही, मराठी मानूस बेईमान नाही आणि तूम्ही कितीही पाठीमागून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल, ज्याला मराठीत **** म्हणतात. धमक्या देतो, मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, या या वेळेस धाड पडणार, हा काय प्रकार आहे? तुम्हांला काय वाटत आम्ही झुकु? बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल आहे, गुडघे टेकायचे नाहीत.”

“भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात नालायक पणा सुरू केला आहे. आतापर्यंत शिवसेनेकडुन उत्तर दिलं नव्हतं. आता उद्धवजींनी सांगितल आहे, आधी लोकांसमोर वस्तुस्थिती येऊ द्या. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. बाहेरचे लोक येऊन आमच्या घरात घुसणार, दादागिरी करणार, आमच्या बायकामुलींकडे बघणार आणि हे भाजपाचे लोक टाळ्या वाजवणार?”, असे देखील संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!