🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना नाही तर आज महाराष्ट्र बोलणार असे म्हटले आहे. आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. (Shiv Sena Press Conference) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तत्पूर्वी शिवसेना भवनाबाहेर ‘झुकेंगे नही’ बॅनर लावले आहेत. तसेच शिवसैनिकांनी काळ्या रंगाचे टी-शर्टही परिधान केले आहेत. त्यावरही ‘झुकेंगे नही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भाजपने निशाण्यावर धरले आहे. आज या सर्वांची उत्तरे मिळतील का? आजच्या पत्रकार परिषदेतून राजकीय भूकंप होणार का? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.
दरम्यान उद्या शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. जनतेने माझी उद्याची पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनीही पत्रकार परिषद ऐकायला हवी. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे. “बर्दाश्त किया, अब बरबाद करेंगे”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
काही महत्वाचे मुद्दे-
१. जम्बो कोविड सेंटर घोटाळा-
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मिळून कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान लाईफलाईन हॉस्पिटल मधील घोटाळयाप्रकरणी आजच किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
२. वाईन व्यवसायात संजय राऊतांची गुंतवणूक-
संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे. मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर संजय राऊत यांनी पार्टनरशीप केली असून त्यात त्यांची पत्नी आणि कन्या यांचाही समावेश आहे. यामध्येही त्यांनी कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
३. प्रवीण राऊत आर्थिक घोटाळा प्रकरण-
संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना मनिलॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी एका आघाडीच्या राजकीय नेत्याबरोबर आर्थिक व्यवहार (financial deal)केले आहेत आणि अनेक बड्या व्यक्तींसाठी ते अशी कामे करतात असा खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशीही ईडीने गेल्या वर्षी पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी केली होती. त्यातून प्रवीण राऊत यांच्या पत्नीशी त्यांचा संबंध असल्याचा दावा यंत्रणेने केला होता. मुंबईतील एका चाळीच्या पुनर्विकास प्रकरणात सुमारे १०३४ कोटींचा भूखंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे राऊत माजी संचालक होते.
४. संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र-
ईडीसारख्या तपास संस्थांच्या मदतीने शिवसेनेच्या आमदार व खासदारांना त्रास देऊन लोकशाही मार्गाने निवडून आलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना पाठविलेल्या पत्रात केला. तसेच जवळपास एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करा, अन्यथा आपली स्थिती कारागृहात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख सारखी होईल असे म्हटले गेले. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांचे लेटर बॉम्बने राजकारणात मोठ्या हालचाली घडवून आणल्या.
५. किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण-
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या पुण्यातील कोविड सेंटरमधील घोटाळयाप्रकरणी पुणे महापालिकेत गेले होते. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमीही झाले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आदेशाने धक्काबुकी करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याबाबत तक्रारही केली होती.
६.’ते’ साडे तीन लोक कोण? याचे उत्तर मिळणार का?
काल पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “जे लोक आम्हाला म्हणतात की, अनिल देशमुख यांच्या कोठडीत तुम्ही काही दिवसांत दिसणार. मात्र येत्या काही दिवसांत भाजपचेच साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत दिसतील, आणि अनिल देशमुख बाहेर असतील.’,असा दावा त्यांनी केला होता. आज ते साडे तीन नेते लोक कोण आहेत. याबाबत खुलासा होईल का, याबाबतही उत्सुकता लागली आहे.
७ . भाजप नेत्यांची दिल्लीवारी-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहेत. किरीट सोमय्या अगोदरच दिल्लीला जाणार होते. मात्र अचानक चंद्रकांत पाटीलही दिल्लीवारी करीत आहेत. आजच शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. यात संजय राऊत काय आरोप करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आँधी जब आती है तब क्या-क्या लेके जाती है, हे त्याला माहित नाही”; प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका
- BREAKING : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेआधी भाजप नेत्यांची अचानक दिल्लीवारी; चंद्रकांत पाटील, सोमय्या रवाना
- ७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून सुसाट स्टंट ; तरुणाईला लाजवेल असा उत्साह
- मुंबईत राजधानी एक्सप्रेसची दुचाकीला धडक; काळ आला होता पण वेळ आली नव्हती
- “… तर किरीट सोमय्यांच्या डोक्याचा, मेंदूचा चिवडाच झाला असता”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
