Share

महाराष्ट्र ***ची औलाद नाही, कितीही वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरु झाली असून यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री,आमदार, खासदार या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी दाखल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघायला मिळाला. तसेच ते येथे दाखल होताच त्यांच्या हातात खूप मोठ्या फाईल्स दिसून आल्या. यावेळी बोलत असतांना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच महाराष्ट्र ***ची औलाद नाही, कितीही वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी मला वाटतंय ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे, असे म्हणत केली. तसेच अनेक नेत्यांचे सकाळपासून फोन आल्याचेही त्यांनी सांगितले.  तसेच चढ आणि त्या आक्रमणा विरुद्ध रणशिंग फुक, काही पाप केले नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका, असेही मला सांगण्यात आले. तसेच पुढे राऊत म्हणाले की ,महाराष्ट्र…ची औलाद नाही, कितीही वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,  काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रमुख लोकं मला भेटले.  त्यांचे नाव मी सध्याच जाहीर करणार नाही. परंतु जेव्हा ते मला भेटले तेव्हा ते मला म्हणाले की ,तुम्ही मध्ये पडन नका तुम्ही आम्हाला सरकार आणण्यासाठी मदत करा. तसेच जर तुम्ही बाहेर पडला नाहीत तर यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, असा खुलासाही यावेळी राऊत यांनी केला. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिल्यानंतर हे सर्व प्रकरण सुरु झाल्याचेही तते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!