Share

अमेरिकेने लसीच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, भारतात लसींचे उत्पादन वाढणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अमेरिकेने अॅस्ट्राझेनेका, नोव्हावॅक्स आणि सनोफीवर लागू असलेले निर्बंध हटवले आहेत. यामुळे लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या उत्पादनासाठी पुरेशी साधने व कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार आहे. शिवाय, भारतासह इतर देशांना लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे लसीचे उत्पादन वाढू शकेल.

याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लसीसंबंधीच्या धोरणात बदल केल्याबद्दल आभार मानले आहेत.

शुक्रवारी सोशल मीडियावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ पूनावाला यांनी म्हटले आहे की, या नव्या धोरणामुळे जागतिक पातळीवर तसेच भारताला कच्च्या मालाचा पुरवठा वाढणार आहे. त्यामुळे या महामारीविरुद्धचा लढा अधिक बळकट होऊ शकेल.

सीरम देशात कोविशील्ड या लसीचे उत्पादन करत आहे. दरम्यान, सीरमला आता स्पुटनिक-व्ही या लसीच्या उत्पादनाचीही परवानगी मिळाली आहे. डीसीजीआयने शुक्रवारी ही मंजुरी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!