Share

महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात सोमवारपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकाने, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही.

गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच टप्पे सध्या ठऱवण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. मात्र, प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासन काढणार आहे.

असे आहेत पाच स्तर

पहिला स्तर : करोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे

पहिल्या स्तरातील जिल्हे – औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ

दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत असे जिल्हे.

दुसऱ्या स्तरातील जिल्हे –  अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार

तिसरा स्तर : पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे

तिसऱ्या स्तरातील जिल्हे – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

चौथा स्तर : पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे

चौथ्या स्तरातील जिल्हे – रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,

पाचवा स्तर : पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापले आहेत असे जिल्हे.

पाचव्या स्तरातील जिल्हे – कोल्हापूर

पहिल्या टप्प्यात काय सुरू ?
अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, माॅल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शूटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई-कॉमर्स सुरू राहील. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहेत. बस १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. इतर राज्यांतून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहील.

दुसऱ्या टप्प्यात काय सुरू राहील
अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरू. मॉल्स, थिएटर्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. लग्नकार्यात हॉलच्या ५०% क्षमता वा १०० माणसांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. कार्यालयांत १००% उपस्थिती असू शकेल. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण. ई-सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने. जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार, बसेस, लाँग ट्रेन, खासगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाइन, ई-कॉमर्स सुरू करण्यात आले आहे. जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही.

तिसऱ्या टप्प्यात काय सुरू राहील
अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुली, दुपारी २ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा. खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू. आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ५ ते ९ सुरू असतील. स्टुडिअोत चित्रीकरण परवानगी, मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार. हे सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

चौथ्या टप्प्यात काय सुरू राहील?
अत्यावश्यक सेवा ४ वाजेपर्यंत सुरू असतील. इतर दुकाने बंदच राहतील. चित्रपटगृहे, माॅलही बंदच राहतील. रेस्तराँमध्ये फक्त पार्सललाच परवानगी असेल. सरकारी, खासगी कार्यालयांत २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरू राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न समारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील. संचारबंदी लागू असणार आहे. सलून, जिम दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभे राहता येणार नाही.

पाचव्या टप्प्यात काय सुरू राहील
सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार-रविवार मेडिकल वगळता सर्वच बंद. इतर सर्व दुकाने बंदच राहतील. रेस्तराँत फक्त पार्सलला परवानगी. संचारबंदी लागू. इतर सर्व बंद असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!