मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढली. यानुसार रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या निकषाआधारे जिल्ह्यांची विभागणी होईल. यात उपरोक्त निकषांआधारे पाच टप्पे करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांचे स्वरूप लागू असेल. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
उदा. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांत जवळपास पूर्ण अनलॉक असेल. याआधारे पुढील चार टप्पे असतील. यानुसार औरंगाबाद जिल्ह्याचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होत असल्याने जिल्ह्यात बहुतांश कठोर निर्बंध शिथिल होतील. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काढण्यात आली.
????Level of restrictions for breaking the chain ???? pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांसाठी वेळेचं बंधन नसेल. तर दुसऱ्या टप्प्यात यासाठी 50 टक्केच उपस्थितीची अट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. तर चौथ्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि इतर दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहतील. या ठिकाणी वीकेंड लॉकडाउन लागू असेल. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

