मुंबई : अनेक सेलेब्रिटी त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडीयावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र अनेकदा सेलेब्रिटीनी शेअर केलेल्या फोटोवरून आणि व्हिडीओवरून त्यांना ट्रोल केले जाते. त्यामुळे आता सेलेब्रिटी देखील गप्प न राहता ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री हेमांगी कवीने ट्रोल करणारऱ्याना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर तिची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा होत आहे. हेमांगीनंतर अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने तिच्या गरोदरपणावरुन ट्रोल करणाऱ्यांना इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
https://www.instagram.com/p/CRXzRtlp-cU/?utm_source=ig_web_copy_link
उर्मिलाने गरोदरपणातील काही फोटो पोस्ट केल्यानंतर महिलांकडूनच तिला ट्रोल केलं जात आहे. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला चांगलच सुनावले आहे. सोशल मीडियावर उर्मिलाला पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’, ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक?’, ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’, मागच्या नऊ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे.’
पुढे ती म्हणते, ‘एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाही की, माझा नववा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.’ असे म्हणत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
उर्मिलाने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून अभिनय केला आहे. शिवाय तिने संगीत सम्राट या रिअॅलिटी शोमध्ये गायक रोहित राऊत सोबत सूत्रसंचलन केलं आहे. तसेच सध्या तिचे युटूबवरील अनेक व्हिडीओ देखील चर्चेत असतात. तिच्या व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडतात.
महत्तवाच्या बातमी
- टी-२० विश्वचषक! प्रबळ दावेदारच होऊ शकतात पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी
- मराठा आंदोलनातील शहिदांच्या नातेवाईकांना दिलेल्या आश्वासनांची मराठा क्रांती मोर्चाने दिली आठवण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

