Share

मराठा आंदोलनातील शहिदांच्या नातेवाईकांना दिलेल्या आश्वासनांची मराठा क्रांती मोर्चाने दिली आठवण

Published On: 

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील अनेकांनी बलिदान दिले आहे. त्या नंतरच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतली होती. या आंदोलनात शहिद झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पहिवहन मंत्री अनिल परब यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देत आश्वासनाची आठवण करुन देण्यात आली.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांनी जिल्ह्यातील परिवहन व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने परब यांना एक निवेदन दिले. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यात राज्य शासनाने आश्वासन दिले होते, त्याच मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी या शहीद झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही नियुक्ती न झाल्याने हे निवेदन देण्यात आले. यापूर्वी याच मागण्या विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांच्याकडेही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!