Share

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिलाने उडवली कंगनाची खिल्ली

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला.

यानंतर, कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मात्र, शिवसेनेच्या आव्हानाला ललकारत ती याआधीच मुंबईमध्ये येऊन गेली होती. रविवारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर आज कंगनाने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.

‘सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही,’ असं म्हणत कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कंगनाला खोचक टोला लगावला आहे.

कंगनाने मराठमोळ्या वेशातील फोटो ट्विटरवर शेअर करतानाच, ‘मला माझ्या प्रिय मुंबईसाठी उभं राहताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. आज मी मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सुरक्षित व चांगली भावना अनुभवली आहे’ असं कॅप्शन शेअर केलं आहे. यावरूनच उर्मिलाने, ‘माझ्या प्रिय मुंबईसाठी उभं राहणं?’ असे तिचेच वाक्य म्हणत ‘पुढे बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…’ अशी खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!