मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद पाठोपाठ आता मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वबळाने लढण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात अशी गर्जनाचं केली. यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे.
‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ. तर, वरिष्ठांनी निर्णय घेतल्यास मुंबईत महापौर बसवू,’ असा पुनरुच्चार भाई जगताप यांनी केला आहे. काँग्रेसच्या या मनसुब्यावर भाजप नेते आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी जहरी टीका केली आहे.
‘काँग्रेस नेते म्हणतात, श्रेष्टींनी ठरवलं तर आम्ही महापौर बसवू, क्रॉफर्ड मार्केटमध्ये एखादा आयटम विकत घ्यावा, असं काही निवडणुकीतील पद आहे का? इतक्या सहजपणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येत नाही. काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा. बरं हे आम्ही म्हणत नाही तर तुमच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ती शिवसेना म्हणत आहे. तुमच्यासोबत मतदार राहिले नाही. तुमचे नेते राहुल गांधी आता बिनकामाचे झाले ही शिवसेनाच म्हणते’ असा टोला देखील आशिष शेलार यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट
- सिंघू बॉर्डरवर सुरु झाला शेतकरी मॉल, दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
