Share

काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य केले होते. यासोबतच, केंद्रातील विरोधक म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यासह युपीएची ताकद कमी पडत असल्याची टीका देखील शिवसेनेनं केली होती.

यानंतर, काँग्रेस नेत्यांनी देखील शिवसेनेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, ‘शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही,’ असं विधान केलं होतं.

काँग्रेच्या इतर नेत्यांनी देखील शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने उघडपणे घेतला आहे. हा स्वबळाची नारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकत्र लढण्याच्या भूमिकेशी विसंगत असल्याने महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढत आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याच स्वरव पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक आज संध्याकाळी पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शिवसेना-काँग्रेसमधील वादावर पडदा टाकण्यासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांतर्फे सांगण्यात येतंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!