Share

‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?

Published On: 

🕒 1 min read

बीड : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. याच मुद्द्यावरून कालपासून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली.

‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. राज्यातील सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल. मुझसे पंगा मत लेना, में नंगा आदमी हूं’ असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्या ‘नंगा आदमी हूं’ या वक्तव्यावरून भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. ट्विटरवरून राऊतांची खिल्ली उडवताना अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचं विडंबन केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचं हे विधान चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतं. राजकीय टीकेसाठी देशभक्तीपर गाण्याचा असा उपयोग हा दुर्दैवीच आहे.

अवधूत वाघ यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी सडकून टीका करत समाचार घेतला आहे. ‘यांची सद्द्विवेक बुद्धी गहाण ठेवली आहे का ??अशा विक्रुत लोकांना राजकीय पक्षात ठेवतातचं कसे ?? असे ट्विट करताना जनाची नाही, निदान मनाची तर लाज वाटायला पाहीजे. यांनी आपल्या देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केला आहे. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये ?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच, ‘कुठे ते देशासाठी हसत-हसत फासावर जाणारे देशभक्त, आज ही सीमेवर आमचे जवान शहीद होतायत फक्त देशासाठी… आणि कुठे हे असले दळभद्री वक्तव्य करणारे , असली लोक आपल्या देशाला लागलेली कीड आहेत.’ असा हल्लाबोल देखील रेखा फड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!