🕒 1 min read
नवी मुंबई : गेल्या वर्षभरात भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. २०१४ नंतर भाजपमध्ये झालेली मेगाभरती थांबली आहे. तर, भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थक नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला.
यानंतरही, भाजपला छोटे-मोठे धक्के सहन करावे लागले. महाविकास आघाडीतील एकीममुळे भाजपला पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांमध्ये देखील जिव्हारी लागणार पराभव स्वीकारावा लागला होता. आता, शिवसेनेनं भाजपला आणखी एक तडाखा दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेतील तीन नागरसेवकरांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचं ठरवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते हे तीन नगरसेवक शिवसेनेत जाणार आहेत. हे तीन नगरसेवक भाजपचे माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र, त्यांच्या जाण्याने भाजपसह गणेश नाईकांना नवी मुंबईत नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक
- ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
