🕒 1 min read
पुणे : निवडणूक आयोगानं २० नोव्हेंबर २०२० च्या आदेशान्वये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार १ डिसेंबर २०२० रोजी सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
सदर निवडणुका पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नामनिर्देशनपत्रे स्वीकार करण्यास सुरुवात झाली आहे. उमदेवार अर्ज ३० डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंत द्यावी लागणार आहेत. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरतांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
अशातच, सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीपासून ते उमेदवारी अर्ज भरेपर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ सुरु असल्याचं दिसतंय. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वारंवार बदलत असणाऱ्या निर्णयांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नामनिर्देशनपत्र देण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्यानं आज जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर झुंबड उडालेली पाहायला मिळाली.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज म्हणजेच २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत व पोहोच पावती मिळावी याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते, त्यामुळे तातडीने हा निर्णय घेतल्याचे मुंडेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक
- मुंबईत राहण्यासाठी फक्त बाप्पाच्या परवानगीची गरज; कंगनाने शिवसेनेला डिवचलं
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
