🕒 1 min read
औरंगाबाद: गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. मात्र बुधवारी तब्बल ४१० रुग्ण निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाद्वारे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका सज्ज झाली असून मनपा ‘कोरोना वॉर रुम’ अद्ययावत करण्यात आली आहे. यामध्ये इतर कामांसोबत टेस्टींग, लसीकरण व होम आयसोलेशन रुग्ण मॉनिटरींगवर भर देण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाद्वारे दररोज नवीन नियम लागू केले जात आहेत. मराठवाड्यातील नांदेड मध्ये बुधवारी ४७४ कोरोना बाधित आढळून आले आहेत. नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २३ टक्क्यांवर आला आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातही ४३४ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. लातूरचा पॉझिटिव्हिटी रेट पंधरा टक्क्यांवर पोहोचला आहे.
जालना जिल्ह्यात बुधवारी ९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परभणीमध्ये आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. परभणीत ७३ कोरोना रुग्ण आढळून आले असून पॉझिटिव्हिटी रेटही २ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक रुग्ण नांदेडमध्ये आणि त्यानंतर औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून सूर्याने दर्शनही दिलेले नाही. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”

