Share

औरंगाबाद जिल्ह्यातील इंग्रजी शाळा उघडणार; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मेस्टाचा निर्णय!

Published On: 

औरंगाबाद: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १७ जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेने घेतला आहे. आम्हालाही विद्यार्थ्यांची काळजी आहे, पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. प्रशासनाने कारवाई केली तरी आम्ही शाळा उघडूच, असे मेस्टाचे संस्थापक संजय तायडे पाटील यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) ११ व १२ जानेवारी रोजी संस्थाचालकांची बैठक घेतली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात, असे निवेदन दिले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही अर्ज दिला आहे. सध्या बाजारपेठ, मॉल, सिनेमागृहे सुरू आहेत. मग शाळा का नाही? आम्ही सर्व नियम पाळून शाळा सुरु करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!