Share

लॉकडाऊनवर बनवलेल्या “या” चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्बंधांचं सावट; दिग्दर्शक भांडारकर चिंतेत

Published On: 

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांचा थेट परिणाम हा मनोरंजन क्षेत्रावर होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे बऱ्याच चित्रपट प्रदर्शन लांबणीवर पडतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) हे देखील त्यांच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजबद्दल विचार सुरू करत आहेत. तसेच वाढत्या कोरोनामुळे त्यांच्या आगामी एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची (release) चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान “दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे अचानक बंद झाली आहेत. जर्सी आणि इतर अनेक चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या रांगेत होते. मात्र या परिस्थितीमुळे त्यांना आता पुन्हा एकदा धक्का बसला आहे. यानंतर आता आपण काय करावे?” असा प्रश्न त्यांना पडल्याची माहिती मधुर भांडारकर यांनी स्वत: दिली आहे.

https://www.instagram.com/p/CYdVLhFo0Mn/?utm_source=ig_web_copy_link

“तसेच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावा का? असाही प्रश्न त्यांना पडला पडल्याचं बोललं जात आहे. चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर सूर्यवंशी आणि पुष्पा (Suryavanshi and Pushpa) या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक जण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत होते. मात्र करोनामुळे पुन्हा चिंता वाढली आहे,” असेही त्यांनी सांगितले. भांडारकर यांचा ‘इंडिया लॉकडाऊन’ (‘India Lockdown’) हा चित्रपट पहिल्या लॉकडाऊनवर (lockdown) आधारित आहे. या चित्रपटात प्रतिक बब्बर, आहाना कुमरा आणि श्वेता बसू प्रसाद हे कलाकार दिसणार आहेत.

भांडारकर यांनी ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’  (‘Page Three’, ‘Fashion’, ‘Jail’ and ‘Heroine’) यासारखे वेगळ्या विषयांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यानुसार मधुर भांडारकर यांचा “ इंडिया लॉकडाऊन” हा चित्रपट येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र वाढत्या करोनामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित करावा याबद्दल अत्यंत गांभीर्याने ते विचार करताना दिसत आहेत. तसेच याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!