Share

‘शेतकऱ्यांसाठी पैसा नसतो, मात्र स्वतःच्या आमदारासाठी कोट्यवधींची माफी?’; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना सवाल

Published On: 

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या बाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत ठाकरे सरकार तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली होती. मात्र बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांना माफ केले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजप नेते तसेच प्रवक्ता केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. केशव उपाध्ये ट्विट करत म्हणतात, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

तसेच एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय. वा रे उद्धव ठाकरे सरकार, असा टोला देखील केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. शिवसेना आमदारांना अनियमित बांधकम केले तरी सर्व माफ असल्याचं ठाकरे सरकारचं धोरण आहे, असंही उपाध्ये यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!