सांगली –सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु सरकारनं आषाढी वारीसाठी मोजक्याच आणि मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. अशातच आता पायी वारी सोहळ्याच्या परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही केली आहे.
‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी’अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या या मागणीमुळे उलटसुलट चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. भिडे यांनी कोरोना बाबत यापूर्वी देखील काही वादग्रस्त विधाने केली आहेत. फक्त विधानेच नव्हे तर काहीवेळा वादग्रस्त कृती देखील यापूर्वी केलेली आहे. संभाजी भिडे यांनी याआधी एका कार्यक्रमात चक्क आमदारालाच मास्क काढायला लावला होता. त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला होता. विशेष म्हणजे कोरोना होत नाही मास्क काढा असं भिडे यांनी सांगितल्यावर बाबर यांनी देखील मास्क काढून टाकला होता. भिडे यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान त्यावेळी भिडे यांनी केले होते.
‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे? मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही’ असं म्हणत सरकारवर देखील तोफ डागली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्याड हल्ल्यानंतर रोहित पवारांचा फोटो ट्विट करून पडळकरांनी नेमके काय दिले आहेत संकेत ?
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’
- गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

