Share

भ्याड हल्ल्यानंतर रोहित पवारांचा फोटो ट्विट करून पडळकरांनी नेमके काय दिले आहेत संकेत ?

Published On: 

सोलापूर : भाजपचे विधान परिषद सदस्य तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पडळकर यांच्या मोटारीवर सोलापुरात समाजकंटकाने दगडफेक केल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शहराच्या भवानी पेठ-मड्डी वस्ती भागात रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

आमदार पडळकर हे बुधवारी सोलापुरात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सायंकाळी भवानी पेठेत धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीसाठी ते जात असताना त्यांच्या मोटारीवर एका अज्ञात समाजकंटकाने दगडफेक केली.

 

खा. शरद पवार यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पडळकर यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांच्या रागातून हा हल्ला झाला असल्याचा आरोप होत आहे. पडळकर यांनी या भ्याड हल्ल्यानंतर एक ट्वीट केले आहे. प्रस्थापितांनी बहुजनांवर हल्ला केलाय. पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार…, असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे . यासोबतच यापुढे देखील ते अशाच पद्धतीने आक्रमक भूमिका मांडत राहतील असे संकेत त्यांनी दिले आहेत.

‘महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही’, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली.

 

निलेश राणेंचा प्रहार

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा गर्भित इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!